जळगाव जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण पोहोचले ६१ टक्क्यांवर…

जिल्ह्यात आज दिवसभरात ४४३ कोरोना बाधित आढळले तर ७८३ बरे झाले

जळगाव : आज गुरुवारी करोनाबाधित रुग्णांची संख्या जिल्ह्यात ४४३ आढळली असुन दिवसभरात ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता पर्यंत जिल्ह्यात एकुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४५८७२ झाली आहे. त्यापैकी ३५९६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आतापर्यंत ११३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ८७७४ रुग्ण उपचार घेत आहेत.दिवसभरात बरे होणाऱ्यांची संख्या ७८३ झाली आहे. तसेच जिल्ह्यात ७८.३९ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. मृत्युदर २.४८ टक्क्यांवर आलेला आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ११४, जळगाव ग्रामीण ०६, भुसावळ ५३, अमळनेर ४१, चोपडा ४३,पाचोरा १४ , भडगाव १०, धरणगाव ०७, यावल २५, एरंडोल १२, जामनेर १९, रावेर ३३, पारोळा ११, चाळीसगाव ३८, मुक्ताईनगर ०४, बोदवड १२, इतर जिल्ह्यातील १, आहेत ८७७४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या गेल्या आठवड्यापासून घट्त असल्याने नागरिकांसह प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.