प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

एकीकडे चाळीसगाव तालुक्यात १२३ मि.मी. पावसाची नोंद झाली असताना, इतर तालुक्यांमध्ये मात्र २५ मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झालेला नाही. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात सरासरी १९६ मि.मी. पाऊस होत असतो, त्यापैकी आतापर्यंत १५२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

    जळगाव (Jalgaon) : जिल्ह्यातील (Jalgaon district) चाळीसगाव तालुक्यात (Chalisgaon taluka) एकाच दिवसात रेकॉर्डब्रेक १२३ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात चाळीसगावात एकाच दिवशी झालेला हा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. रात्रभर तालुक्यात पाऊस कोसळत होता. दरम्यान, जळगाव तालुक्यात (Jalgaon taluka) देखील मंगळवारी पावसाने हजेरी दिली.
    (the highest rainfall in a single day in Chalisgaon)

    जळगाव जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. चाळीसगाव तालुक्याला पावसाने अक्षरश झोडपून काढले आहे. तितूर नदीला पूर आला आहे. एकीकडे चाळीसगाव तालुक्यात १२३ मि.मी. पावसाची नोंद झाली असताना, इतर तालुक्यांमध्ये मात्र २५ मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झालेला नाही. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात सरासरी १९६ मि.मी. पाऊस होत असतो, त्यापैकी आतापर्यंत १५२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

    जळगाव शहरातही मंगळवारी पावसाने हजेरी लावली. सकाळी १० वाजता सुमारे १५ ते २० मिनिटे पाऊस झाला. दुपारी देखील अर्धातास शहरात पावसाने हजेरी लावली तर सायंकाळी ६ वाजेपासून शहरात पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने जळगावकरांना दिलासा मिळाला. जिल्ह्यात आतापर्यंत ४१८ मि.मी. पाऊस झाला आहे. एकूण सरासरीच्या टक्केवारीत ८२ टक्के हा पाऊस आहे. चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक पाऊस १४४ टक्के पाऊस झाला आहे तर चोपडा तालुक्यात सर्वात कमी ५२.५ टक्के पाऊस झाला आहे.