jalgav mla chandrakant patil

एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांची मानसिकता काय आहे ते सर्वांना माहीत आहे. या मानसिकतेतून जात असताना त्यांच्याविषयी खऱ्या अर्थाने सहानुभूती आहे. मात्र सध्या त्यांचं डोकं ठिकाणावर नाही अशी प्रतिक्रिया आज मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांनी दिली आहे.

    जळगाव: मुक्ताईनगर(Muktainagar) तालुक्याचा जर काही विकास करायचा असेल तर संयुक्त पद्धतीने करायला पाहिजे. मुक्ताईनगर मतदार संघातील जी गावे आहेत, त्यांच्या विकासासाठी काम न करता एकनाथ खडसे(Eknath Khadse) हे फक्त टीकाटिप्पणी करत आहेत, असा आरोप आज मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील(MLA Chandrakant Patil) यांनी केला आहे. एकनाथ खडसे यांची मानसिकता काय आहे ते सर्वांना माहीत आहे. या मानसिकतेतून जात असताना त्यांच्याविषयी खऱ्या अर्थाने सहानुभूती आहे. मात्र सध्या त्यांचं डोकं ठिकाणावर नाही अशी प्रतिक्रिया आज मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

    मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी ओझरखेडा तलावामध्ये पाणी टाकण्यासाठी जलसमाधी आंदोलन केले होते. त्यामुळे तलावांमध्ये पाणी टाकले जात आहे .मात्र त्याचे श्रेय एकनाथराव खडसे यांनी स्वतःच्या मुलीला रोहिणी खडसे यांना दिल्यामुळे आज आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथराव खडसे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.