Shame on Jalgaon Municipal Corporation for sealing bank accounts? 13 crore arrears of revenue department

भाजपचे २७ नगरसेवक फुटल्‍याने मोठी खिंडार पडली आहे. यामुळे भाजपजवळ महापौर पदासाठी दावा करण्यासाठी स्‍पष्‍ट असे बहुमत नाही. तरी देखील भाजपकडून महापौरपदासाठी आम्‍ही दावेदार असल्‍याचे सांगितले जात आहे. मात्र शिवसेनेकडून अर्ज दाखल झाला असून, भाजपकडून अद्याप अर्ज दाखल करण्याची प्रतिक्षा आहे.

  जळगाव : महापालिकेत सत्ता मिळविण्यासाठी आतूर झालेल्या शिवसेनेने चक्क निवडणुकीच्या आधीच जयश्री सुनील महाजन, महापाैर जळगाव महानगरपालिका या नावाची आकर्षक नेम प्लेट तयारी केल्याचे वृत्त आल्याने जळगाव महापालिकेत शिवसेनेच्या जयश्री महाजन याच महापाैर हाेणार यावर शिक्कामाेर्तब झाल्यासारखे आहे.

  जळगाव मनपातील राजकारण पूर्णतः ढवळून निघाले असून, भाजपातून फोडलेल्या नगरसेवकांच्या बळावर शिवसेनेकडून मनपावर भगवा फडकविण्याचे निश्चित दिसते आहे. महापालिकेत सुरू असलेल्‍या फोडाफोडीच्या राजकारणानंतर महापौर पदासाठी दावा करणाऱ्या शिवसेनेकडून आज अर्ज दाखल करण्यात आला. भाजपच्या अर्जाची मात्र अजून प्रतिक्षा आहे.

  शिवसेना-एमआयएमसह आता भारतीय जनता पक्षातून फुटून आलेल्या सदस्यांसह शिवसेनेसोबत सद्य:स्थितीत ४४ सदस्य असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. महापौर आणि उपमहापौर पदासाठी शिवसेनेकडून नाव निश्‍चित करण्यात आले असून सकाळी अकराला महापालिकेच्या सभागृहात दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल करण्यात आला. महापौरपदासाठी जयश्री महाजन तर उपमहापौर पदासाठी कुलभूषण पाटील यांचा अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे गटनेते नितीन लढ्ढा, माजी महापौर विष्‍णू भंगाळे, शरद तायडे, अमर जैन, सुनील महाजन आदी नगरसेवक उपस्‍थित होते.

  अब तक ४८
  सध्या तरी शिवसेनेचे महापौर व उपमहापौरपदाचे उमेदवार अनुक्रमे सौ. जयश्री सुनील महाजन व कुलभूषण पाटील यांना ४८ मते मिळतील असा प्राथमिक अंदाज आहे. म्हणजेच शिवसेना व भाजपमधील सामना ४८ विरूध्द २७ असा असेल हे आज तरी दिसून येत आहे. यात अजून नंतरच्या काही नाट्यमय घडामोडी बदल घडवून आणू शकतात.

  म्‍हणूनच सेना आहे ठाम
  जळगाव महापालिकेत ५७ सदस्यांसह स्पष्ट बहुमत असलेल्या भाजपचे २७ नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. शिवाय, सेनेला ‘एमआयएम’च्या तीन सदस्यांचाही पाठिंबा मिळणार असल्याने गुरुवारी (ता.१८) होणाऱ्या महापौर निवडीत सेनेची सरशी होईल, असा दावा केला जात आहे. ७५ सदस्यांच्या सभागृहात बहुमतासाठी ३८ सदस्यसंख्या हवी. सध्या आमच्याकडे शिवसेनेचे १५, एमआयएमचे तीन आणि भाजपतील २६ अशा एकूण ४४ सदस्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे महापौर, उपमहापौर शिवसेनेचाच होईल, असा दावा शिवसेना करत आहे.

  भाजपची प्रतिक्षा
  भाजपचे २७ नगरसेवक फुटल्‍याने मोठी खिंडार पडली आहे. यामुळे भाजपजवळ महापौर पदासाठी दावा करण्यासाठी स्‍पष्‍ट असे बहुमत नाही. तरी देखील भाजपकडून महापौरपदासाठी आम्‍ही दावेदार असल्‍याचे सांगितले जात आहे. मात्र शिवसेनेकडून अर्ज दाखल झाला असून, भाजपकडून अद्याप अर्ज दाखल करण्याची प्रतिक्षा आहे.

  निवडणूक ऑनलाईनच होणार; खंडपीठाचा निर्णय
  महापौर व उपमहापौरपदांसाठी घेण्यात येणारी निवड प्रक्रिया ऑफलाईन होण्यासाठी दोन नगरसेवकांनी दाखल केलेली याचिका खंडपीठाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे निवड प्रक्रिया ऑनलाईनच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉ. विरन सुरेश खडके व रंजना विजय सोनार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. खंडपीठाचे न्यायमुर्ती संजय गंगापूरवाला आणि श्रीकांत कुळकर्णी यांनी डॉ. विरन सुरेश खडके व रंजना विजय सोनार यांनी दाखल केलेली याची फेटाळून लावली असून महापौर आणि उपमहापौर निवड प्रक्रिया ही ऑनलाईन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.