मी पुन्हा येईन ही भावना अजून गेली नाही, खडसेंचा भाजपवर हल्लाबोल

मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, ही भावना अजून गेली अशा शब्दांच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

जळगाव : पदवीधर आणि शिक्षक (Graduate and Teachers constituency Election Results) मतदारसंघाच्या पाचपैकी एकाही जागेवर भाजपला वर्चस्व मिळवता आलं नाही. दरम्यान, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, ही भावना अजून गेली अशा शब्दांच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

अहम्-पणाचा पराभव झाला. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन ही भावना अजून गेली नाही. पुणे आणि नागपूरसारखा परंपरागत मतदारसंघ भाजपच्या हातून गेला. लोकांचा आता भारतीय जनता पार्टीवरील विश्वास कमी होत चालला आहे आणि महाविकास आघाडीवर विश्वास वाढला आहे’ अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नेहमी म्हणतात, कोणी बाहेर गेल्यावर फरक पडत नाही, आम्ही हिमालयात जाऊन बसू, यांच्या नुसत्या गप्पा असतात, असं म्हणत खडसेंनी चंद्रकांत पाटलांनाही टोला लगावला आहे.