काही लोकांनी भाजपामध्ये असताना मला खूप छळले; फडणवीसांच्या दौऱ्यानंतरच खडसेंची प्रतिक्रिया

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यानंतर राकाँ नेते एकनाथ खडसे यांच्या घरी पाहुणचार घेऊन गेले. त्यावेळी खडसे घरी नव्हते. यानंतर खडसेंनी राकाँ प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. या भेटसत्रामुळे राज्याच्या राजकारणात अनेक चर्चा सुरू झाल्या. मात्र, मुक्ताईनगरमध्ये परतल्यानंतर लगेचच खडसे यांनी यावर प्रतिक्रिया दिली. कोणत्याही चर्चांना अर्थ नाही. मी आता कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी सोडणार नाही, अशी स्पष्ट भूमिका खडसेंनी मांडली. त्याचवेळी काही लोकांनी भाजपामध्ये असताना मला खूप छळले, असे म्हणत खडसेंनी अद्याप जुन्या कोणत्याही गोष्टी विसरल्या नसल्याचे संकेत दिले.

  जळगाव : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यानंतर राकाँ नेते एकनाथ खडसे यांच्या घरी पाहुणचार घेऊन गेले. त्यावेळी खडसे घरी नव्हते. यानंतर खडसेंनी राकाँ प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. या भेटसत्रामुळे राज्याच्या राजकारणात अनेक चर्चा सुरू झाल्या. मात्र, मुक्ताईनगरमध्ये परतल्यानंतर लगेचच खडसे यांनी यावर प्रतिक्रिया दिली. कोणत्याही चर्चांना अर्थ नाही. मी आता कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी सोडणार नाही, अशी स्पष्ट भूमिका खडसेंनी मांडली. त्याचवेळी काही लोकांनी भाजपामध्ये असताना मला खूप छळले, असे म्हणत खडसेंनी अद्याप जुन्या कोणत्याही गोष्टी विसरल्या नसल्याचे संकेत दिले.

  काही जणांनी खूप छळलं

  आता कोणत्याही स्थितीमध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नाही. जुन्या जखमा अद्याप भरलेल्या नाही. दिले. भाजपातील काही विशिष्ट लोकांनी माझा भरपूर छळ केला. माझ्यावरती केसेस केल्या, दाऊदच्या बायकोशी संबंध असल्याचे सांगत चौकशा करण्यात आल्या, अँटी करप्शनच्या चौकशा केल्या, अनेक खोटेनाटे खटले भरले. एवढंच नाही तर सत्तेच्या लालसेपोटी एकनाथ खडसे आडवा येऊ शकतो म्हणून माझा छळ केला.

  ओबीसींना सरकार न्याय देणार

  मुक्ताईनगर येथील निवासस्थानी माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे यांनी विविध विषयांवर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द करण्यात आले आहे. घटनेमध्ये ओबीसींना 50 टक्के आरक्षण मिळावी अशी तरतूद केलेली आहे. पण आरक्षण रद्द झाले हा ओबीसी समाजावर अन्याय आहे. त्यामुळे राज्य सरकारने ओबीसींनी न्याय देण्यासाठी समिती गठीत केली आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.

  केंद्रानेही तातडीने मदत करावी

  फडणवीस यांनी नुकत्यात केलेल्या दौऱ्यावरही त्यांनी टीका केली. रत्नागिरी सारखी, सिंधुदुर्ग सारखी मराठवाड्या सारखी मदत मिळवून देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. पण फडणवीसांनी याठिकाणी आम्ही मदत मिळवून देऊ, असे सांगितले आहे. आता ते राज्य सरकारकडे मदत मागणार आहेत. पण केंद्रानेही मदत केली पाहिजे. हा वादळाचा भाग आहे. चक्रीवादळासाठी पंतप्रधानांनी गुजरातला मदत केली. पण अद्याप महाराष्ट्राचा दौरा केला नाही. वादळाने रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यातील मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे केंद्राने ताबडतोब मदत करण्याची मागणी खडसेंनी केली. दरम्यान, फडणवीस यांच्या दौऱ्यानंतरच्या सर्व शक्यता, चर्चा यांना मात्र खडसे यांच्या प्रतिक्रियेनंतर पूर्णविराम मिळाला आहे. त्याचबरोबर फडणवीस आणि त्यामुळे पर्यायाने भाजपवर असलेली त्यांची नाराजीही जराही कमी झाली नसल्याचे दिसून आले.