किरीट सोमय्यांच्या डोक्यावर परिणाम, गुलाबराव पाटील यांचे टीकास्त्र

किरीट सोमय्या यांनी ठाकरे आणि नाईक कुटुंबियांमध्ये मोठा जमीन व्यवहार झाल्याचा गौप्यस्फोट केला होता. यावरून गुलाबराव पाटील यांनी सोमय्या यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली. किरीट सोमय्या हे बेताल बडबड करत आहेत. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून त्यांना ठाण्याला हलविले पाहिजे, ठाण्यात गेल्यावर त्यांच्या डोक्याला शॉक दिला, तर त्यांची बडबड कमी होईल, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला.

मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबीयांवर जमीन खरेदीचे आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांचे वक्तव्य बेताल आहे. त्यांचे वक्तव्य बेताल असून त्यांना ठाण्याला दाखवले पाहिजे, अशा शब्दात राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केला. जळगावमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ज्या ठाकरे यांच्या पायाशी बसून सोमय्या खासदार झाले, त्या ठाकरे कुटुंबीयांवर ते आरोप करतात. हा अहसान फरामोश माणूस आहे. अशा अहसान फरामोश माणसाने उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबावर आरोप करू नयेत. सुरुवातीला त्यांनी आपली औकात बघावी.

गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा मंत्री, महाराष्ट्र

वास्तुरचनाकार अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात नुकतीच ‘रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मालक आणि संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या अटकेनंतर भाजपनं राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलंय.