प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या जीनसी गावाजवळ वीज पडून बैलगाडीवरुन जाणारे दहा जण जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमी जीनसी गावातीलच रहीवासी असून एकाच कुटुंबातील आहेत.

    जळगाव: जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या जीनसी गावाजवळ वीज पडून बैलगाडीवरुन जाणारे दहा जण जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमी जीनसी गावातीलच रहीवासी असून एकाच कुटुंबातील आहेत.

    जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये मान्सूनच्या पावासाने हजेरी दिली. रावेर तालुक्यात देखील अनेक भागात आज बुधवारी दुपारी वीजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. तालुक्यातील जीनसी गावाच्या शेत शिवारात वीज पडली.

    वीज पडलेल्या ठिकाणाजवळूनच बैलगाडवरुन शेतातून परतत असलेले दहा ग्रामस्थ जखमी झालेत. जखमींना तातडीने रावेर येथिल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

    हे सुद्धा वाचा