मनमाड-मुंबई विशेष ट्रेन १२ सप्टेंबरपासून होणार सुरु, प्रवासासाठी मार्गदर्शक सूचना जारी

भुसावळ:  स्पेशल ट्रेन क्र. ०२११०/०२१०९ (मनमाड-मुंबई-मनमाड) १२ सप्टेंबर २०२० पासून सुरु होईल. तसेच १० सप्टेंबर२०२० पासून तिकिटांचे आरक्षण सुरू होईल. त्यासाठी रेल्वेच्या भुसावळ विभागाने कोरोना काळात विशेष गाड्यांमध्ये प्रवासासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या सूचना पुढीलप्रमाणे आहेत.
–  केवळ आरक्षित प्रवाशांना स्टेशन आवारात प्रवेश आणि प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल.
– कोणतेही अनारक्षित तिकीट दिले जाणार नाही.
–  या गाड्या पूर्णपणे राखीव ठेवल्या जातील. केवळ वैध / कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल
– प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
–  थर्मल स्क्रिनिंगसाठी प्रवाशांनी स्टेशनवर किमान ९० मिनिट अगोदर येणे आवश्यक आहे.
– कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल.
– प्रवाशांनी स्टेशन परिसरात व प्रवासादरम्यान फेस मास्क परिधान करणे अनिवार्य आहे.
–  प्रवाशांना बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोरोनाशी संबंधित सर्व निकष, एसओपीचे पालन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

विविध स्थानकांवर गाड़ी क्र ०२११०/०२१०९ आगमन / प्रस्थान वेळ (मनमाड-मुंबई-मनमाड विशेष):
अप दिशा – :प्रस्थान – मनमाडवरून ०६:०२ वाजता , लासलगाव -०६:१८/०६:२० , निफाड-०६:२८/०६:३० , नाशिक रोड -०७:०७/०७:१० , देवलाली -०७:१६ /०७:१८, कल्याण – ०९.३८/०९:४० , दादर- १०:२५
डाउन दिशा – दादर -१८:२८/१८:३०, कल्याण –१९:१०/१९:१३, देवलाली – २१:२३ /२१:२५, नाशिक रोड – २१:३२/२१:३५, निफाड- २२:००/२२:०२ , लासलगाँव – २२:१५ /२२:१७, मनमाड आगमन २२:५०