लग्नाच्या नावाआड फसवणूक करणाऱ्या टोळीला मारवड पोलिसांनी ठोकल्या बेड्या; एकाच तरुणीचे अनेकांशी लावले विवाह

विवाह इच्छुक तरुणांकडून (who wanted to get married) लाखो रुपये घेऊन एकाच तरुणीचे अनेकांशी विवाह करून पसार होणाऱ्या व अवघ्या १५ दिवसात तरूणीचे दूसरे लग्न लावून फसवणूक करणाऱ्या टोळीला मारवड पोलिसांच्या (The Marwad police) सतर्कतेने पकडण्यात यश आले. या प्रकरणी दोन महिलासह तिघांना अटक (two women have been arrested) करण्यात आली आहे.

    अमळनेर (Amalner).  विवाह इच्छुक तरुणांकडून (who wanted to get married) लाखो रुपये घेऊन एकाच तरुणीचे अनेकांशी विवाह करून पसार होणाऱ्या व अवघ्या १५ दिवसात तरूणीचे दूसरे लग्न लावून फसवणूक करणाऱ्या टोळीला मारवड पोलिसांच्या (The Marwad police) सतर्कतेने पकडण्यात यश आले. या प्रकरणी दोन महिलासह तिघांना अटक (two women have been arrested) करण्यात आली आहे. तर लग्न स्थळावरून (wedding venue) इतर २ जण फरार झाले आहेत.

    ८ दिवसांत वधू पसार
    शहादा तालूक्यातील मंदाणे येथील भूषण संतोष सैंदाणे याचे ६ मे रोजी हिंगोली येथील सोनू राजू शिंदे (राहणार सिद्धार्थ नगर) हिच्याशी विवाह झाला होता. आठ दिवस वधू मुलगी भूषण यांच्याकडे राहिली. मात्र १५ मे रोजी ती घरातून कोणालाही न सांगता पळून गेली १६ मे रोजी भूषणने शहादा पोलीस स्टेशनला हरवल्याची फिर्याद दिली. या घटनेचा तपास हवालदार दीपक परदेशी व विश्वास साळुंखे करीत होते.

    दरम्यान, ही मुलगी अमळनेर तालुक्यातील कपिलेश्वर या त्रिवेणी संगम असलेल्या मंदिरावर ता. २१ रोजी पून्हा दुसरे लग्न करणार असल्याची मािहती मारवड पोलिसांना मिळाल्यावर मारवड पोलिसांना मिळताच पथक कपिलेश्वर मंदिरावर पोहचले. मात्र सदर विवाह जुळवणारी टोळी धूळे जिल्ह्यातील मुडावद तालुका शिंदखेडा येथे गेले असल्याची माहिती मिळाली. त्यांचा पोलिसांनी पाठलाग केला असता तेथून ते जवळच असलेल्या पढावद येथे गेल्याचे समजताच राहुल फुला यांनी तातडीने नरडाणा पोलिसांना कळविले व तिकडून पथक मागवले.

    अखेर चकमा देणाऱ्या टोळीला पडावद येथे पकडले या ठिकाणी सोनू ही प्रवीण शिवाजी पाटील यांच्याकडे लग्न सोहळा करीत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सदर कुटूंबाला विश्वासात घेत सोनूची बंटी बबली कथा सांगितली व तातडीने सोनू व तिची मावशी पूजा प्रताप साळवे राहणार सिद्धार्थ नगर हिंगोली तसेच तिचा मामा योगेश संजय साठे यांना त्यांच्या चार चाकी वाहनासह अटक केली. मुलीची आई व भाऊ पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.