बैलपोळाचे साहित्य खरेदीसाठी ग्राहक नसल्याने व्यापारी चिंतेत; परप्रांतीय व्यापाऱ्यांची डोकेदुखी

परप्रांतीय व्यापाऱ्यांमुळे स्थानिक साहित्य विक्रेत्यांचा व्यवसाय बुडाला असल्याची ओरड स्थानिक विक्रेत्यांकडून केली जात आहे. काही स्थानिक व्यापाऱ्यांनी परप्रांतीय व्यापाऱ्यांना विरोध केला असता त्यांच्याकडून राडा घालण्यात आला असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

    जळगाव (Jalgaon) : बैलपोळा दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, बैलांना सजविण्यासाठी (to decorate the bulls) आवश्यक असलेली साहित्यविक्री (sales of materials) थंडावली आहेत. यामागील कारणही तसंच आहे. शेजारील राज्यातील व्यापारी (Merchants from neighboring states) जळगावातील (Jalgaon) चोपड्यात येऊन कमी दरात साहित्यविक्री करतात; परिणामी स्थानिक व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांचे नुकसान होत आहे.

    परप्रांतीय व्यापाऱ्यांमुळे स्थानिक साहित्य विक्रेत्यांचा व्यवसाय बुडाला असल्याची ओरड स्थानिक विक्रेत्यांकडून केली जात आहे. काही स्थानिक व्यापाऱ्यांनी परप्रांतीय व्यापाऱ्यांना विरोध केला असता त्यांच्याकडून राडा घालण्यात आला असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

    स्थानिक दुकानदार सकाळपासून साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांचे वाट पाहत आहे. एक दोन ग्राहक येतात; परंतु भाव विचारून तेही निघून जातात. या महामारी आणि लाँकडाऊनमुळे महागडा साहित्य खरेदी करून ठेवले आहे; परंतु त्याला ग्राहक नसल्याने लहान व्यापारी चिंतेत सापडला आहे.