चोपड्यात श्रीमती शरच्चंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतनचा विद्यार्थी राज्यात प्रथम

जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरच्चंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) येथील मैत्रेय राजेश वाणी हा विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये कॅम्पुटर शाखेत अंतिम वर्षाच्या परीक्षेत 99.49 टक्के गुण मिळवून राज्यात गुणवत्ता यादीत सर्वप्रथम आला आहे.

    जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरच्चंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) येथील मैत्रेय राजेश वाणी हा विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये कॅम्पुटर शाखेत अंतिम वर्षाच्या परीक्षेत 99.49 टक्के गुण मिळवून राज्यात गुणवत्ता यादीत सर्वप्रथम आला आहे.

    तसेच क्षितिज शैलेंद्र अग्रवाल हा विद्यार्थी 99. 14% गुण मिळवून राज्यातून सहावा आला या दोन विद्यार्थ्यांचे पत्रकार परिषदेत शाल व पुष्प गुच्छ देऊन संस्थेचे अध्यक्ष अॅड संदीप पाटील व सचिव डॉ. स्मिता पाटील यांनी सत्कार करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.

    यावेळी संचालक डी बी देशमुख तंत्रनिकेतन चे प्राचार्य व्ही एन बोरसे उपप्राचार्य एन आर शिंदे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.