तुमचे टॅबही नको, नी App सुद्धा नको; अंगणवाडी सेविकांचे खर्चिक टॅबविरुद्ध आंदोलन

महाराष्ट्र सरकारने टॅबमधील पोषण आहार ट्रॅकर ॲप इंग्रजीत दिले आहेत. ते बऱ्याच अल्पशिक्षित सेवीकांना भरणे जमत नाही..त्यामुळे फजिती होत आहे मानसिक तणावाखाली नोकरी करावी लागत आहे. म्हणून ते मराठीत असावी यासाठी महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना कृती समितीने गेल्या ३ महिन्यापासून बहिष्कार टाकला आहे.

    जळगाव (Jalgaon) : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनच्यावतीने (Maharashtra State Anganwadi and Balwadi Employees Union) जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon district) चोपडा गावात (Chopda village) महाराष्ट्र शासनाने दिलेल्या टॅबवापसीकरिता आंदोलन (an agitation) केले. टॅबमधील पोषण आहार ट्रॅकर App (The Nutrition Diet Tracker App) इंग्रजीत दिले आहे. यात माहिती भरण्याची प्रक्रिया क्लिष्ट असून टॅब वारंवार खराब होत असल्याची तक्रार अंगणवाडी सेविकांनी केली.

    माध्यम प्रतिनिधींशी बोलताना आंदोलनात सहभागी अंगणवाडी सेविकांनी टॅबमधील समस्यांचा पाढाच वाचला. भ्रमणध्वनीची वारंटी गॅरेंटी संपलेली आहे. ते वारंवार बंद होतात. डाऊनलोड होत नाही तसेच रेंज प्रॉब्लेम निर्माण होतो. आणि नादुरुस्त झाले तर शासकीय खर्च दोन हजार रुपये वरच लागतो, दुरुस्ती खर्च सरसकट प्रत्येक नादुरुस्त भ्रमणध्वनी झालेल्या सेविकेस मिळत नाही. त्यामुळे घरचा खर्च करावा लागतो.

    महाराष्ट्र सरकारने टॅबमधील पोषण आहार ट्रॅकर ॲप इंग्रजीत दिले आहेत. ते बऱ्याच अल्पशिक्षित सेवीकांना भरणे जमत नाही..त्यामुळे फजिती होत आहे मानसिक तणावाखाली नोकरी करावी लागत आहे. म्हणून ते मराठीत असावी यासाठी महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना कृती समितीने गेल्या ३ महिन्यापासून बहिष्कार टाकला आहे.

    शासनाने नवीन भ्रमणध्वनी उपलब्ध करून द्यावेत तोवर अंगणवाडी सेविका रजिस्टरवर कामाची नोंद करतील. तसेच पोषण आहार इंग्रजीमध्ये न करता मराठीत उपलब्ध करून द्यावा ही देखील मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली आहे.