जळगावातल्या शिवानी भाऊ विराजसोबत हेलिकॉप्टरने माहेरी जाताना
जळगावातल्या शिवानी भाऊ विराजसोबत हेलिकॉप्टरने माहेरी जाताना

लग्नानंतर माहेरी जायचं म्हटलं तर बहुतेक नवविवाहिता आपल्या भावासोबत कार, रेल्वे किंवा अन्य साधनांनी प्रवास करते; मात्र आपल्या लाडक्या बहिणीला लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी आणण्यासाठी एक भाऊ चक्क हेलिकाॅप्टरने तिच्या सासरी पोहोचला. हे बघून आजुबाजूच्या सर्वच लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. जळगावची शिवानी आणि विराज या बहिण-भावंडांच्या उत्कंठ प्रेमाची ही घटना ! सोशल मीडियावर या व्हिडिओची प्रचंड चर्चा होतेय.

जळगाव (Jalgaon).  लग्नानंतर माहेरी जायचं म्हटलं तर बहुतेक नवविवाहिता आपल्या भावासोबत कार, रेल्वे किंवा अन्य साधनांनी प्रवास करते; मात्र आपल्या लाडक्या बहिणीला लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी आणण्यासाठी एक भाऊ चक्क हेलिकाॅप्टरने तिच्या सासरी पोहोचला. हे बघून आजुबाजूच्या सर्वच लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. जळगावची शिवानी आणि विराज या बहिण-भावंडांच्या उत्कंठ प्रेमाची ही घटना ! सोशल मीडियावर या व्हिडिओची प्रचंड चर्चा होतेय.

जळगावातल्या शिवानी अशोक कावडिया हिचं लग्न परळी वैजनाथमधल्या प्रथितयश जैन कुटुंबातल्या डॉ. कुणाल यांच्यासोबत नुकताच संपन्न झाला होता. प्रथेप्रमाणं लग्नानंतर शिवानीला काही दिवस माहेरी जायचं होतं. तिला नेहण्यासाठी तिचा लाडका भाऊ येणार होता. विराजनं आपल्या बहिणीचं जरा हटके स्वागत करायचं ठरवलं. त्यामुळे त्यानं बहिणीला हेलिकॉप्टरनं आणण्याचा इरादा केला. त्यानुसार परळी इथं विराज हेलिकॉप्टरनं पोहोचला. आपल्याला घेण्यासाठी विराज हेलिकॉप्टर घेऊन आला याचा सुखद धक्का शिवानीला बसला.

बघता बघता गावात बातमी वाऱ्यासारखी पसरली. हेलिकॉप्टर पाहण्यासाठी गावातील लोकांची एकच झुंबड उडाली. हे हेलिकॉप्टर जळगावमधल्या कै. बॅरिस्टर निकम चौक मैदानावर उतरविण्यात आलं होतं. शिवानीचं माहेरी झालेलं भव्य स्वागत पाहून ती चांगलीच भारावून गेली होती. सध्या सोशल मीडियावर याच व्हिडिओची चर्चा दिसून येतेय.