air-conditioned waiting room at Bhusawal

नवीन वातानुकूलित प्रतिक्षालयाचे उदघाटन हे ऑनलाईन करण्यात आले . याप्रसंगी अप्पर मंडळ रेल प्रबंधक श्री मनोज सिन्हा , वरिष्ठ मंडळ परिचालन प्रबंधक श्री.आर के शर्मा, मंडळ अभियंता श्री. तोमर हे उपस्थित होते.

भुसावल : भुसावल स्टेशन (Bhusawal station) येथे यात्री सुविधासाठी बनवण्यात आलेले प्लॅटफॉर्म नंबर ४ वर नवीन वातानुकूलित प्रतिक्षालयाचे (air-conditioned waiting room) आज दिनांक – ११.०९.२०२० रोजी ११.०० वाजता ऑनलाईन मध्यमाद्वारे उदघाटन (Online inauguration) करण्यात आले . याप्रसंगी कार्यक्रमात प्रमुख माननीय खासदार श्रीमती रक्षा खडसे यांनी फोन वर शुभेच्या दिल्या त्याच बरोबर माननीय आमदार श्री संजय सावकारे, यात्री सुविधा समिती सदस्य डॉ. राजेंद्र फडके, मंडळ रेल उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य श्री परीक्षित बऱ्हाटे, डॉ माधव धांडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

सर्व प्रथम कार्यक्रमाची सुरुवात वरिष्ठ मंडळ परिचालन प्रबंधक श्री आर के शर्मा यांनी केली आणि मंडळ रेल प्रबंधक श्री विवेक कुमार गुप्ता यांनी सर्व प्रमुख अतिथी यांचे स्वागत केले. कार्यक्रम ची प्रस्तावना वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक श्री युवराज पाटील यांनी केली. नवीन वातानुकूलित प्रतिक्षालयाचे उदघाटन हे ऑनलाईन करण्यात आले . याप्रसंगी अप्पर मंडळ रेल प्रबंधक श्री मनोज सिन्हा , वरिष्ठ मंडळ परिचालन प्रबंधक श्री.आर के शर्मा, मंडळ अभियंता श्री. तोमर हे उपस्थित होते. तसेच भुसावळ स्टेशन येथे स्टेशन डायरेक्टर श्री जी.आर.अय्यर, स्टेशन प्रबंधक श्री. श्रीवास्तव , मुख्य खंड वाणिज्य निरीक्षक श्री.सुदर्शन देशपांडे व इतर कर्मचारी उपस्थित होते.

माननीय आमदार श्री संजय सावकारे व यात्री सुविधा समिती चे सदस्य डॉ राजेंद्र फडके यांनीही याप्रसंगी आपले विचार व्यक्त केले. मंडळ वाणिज्य प्रबंधक श्री बी अरुण कुमार यांनी सर्व सदस्याचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता केली.