का  भडकल्या पंकजा मुंडे?

भगवान भक्तीगड सावरगाव या ठिकाणी आयोजित मेळाव्याला मोजक्या कार्यकर्त्यांची उपस्थिती अपेक्षित होती. मात्र यावेळी नियमाचे उल्लंघन होऊन अधिक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी गर्दी केली. याप्रकरणी पंकजा मुंडेंसह जवळपास ४० ते ५० जणांविरोधात अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी भगवान भक्तीगड सावरगाव या ठिकाणी ऑनलाईन दसरा मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी नियमांचा भंग झाल्याप्रकरणी अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात अनेक नेत्यांनी दौरे केले, अनेकांनी नियम मोडले, पण आपल्यावरच गुन्हा दाखल झाल्याबद्दल पंकजा मुंडेंनी नाराजी व्यक्त केली आहे.

भगवान भक्तीगड सावरगाव या ठिकाणी आयोजित मेळाव्याला मोजक्या कार्यकर्त्यांची उपस्थिती अपेक्षित होती. मात्र यावेळी नियमाचे उल्लंघन होऊन अधिक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी गर्दी केली. पंकजा मुंडेंनी या दिवशी गोपीनाथ गडावर जाऊन नमस्कार केला, भगवानगडावर पूजाअर्चा केली आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. याप्रकरणी जवळपास ४० ते ५० जणांविरोधात अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंकजा मुंडेंसोबत उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांनी यावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन केलं नाही. आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात घालून दिलेले नियमही यावेळी धाब्यावर बसवण्यात आले. स्वतः पंकजाच या नियमांचं पालन करत नसल्याचं पोलिसांनी म्हटलंय. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे, जिंतूरच्या मेघना बोर्डीकर, भीमराव धोंडे, सविता गोल्हार, विजय गोल्हार, सुवर्णा लांबरूड, संदेश सानप, राजेंद्र सानप, राजाभाऊ मुंडे आदींचा समावेश आहे.