नवीन आदेश धडकताच पोलिस ॲक्शन मोडवर; शहरामध्ये पोलिस गस्त वाढली

जळगाव जिल्ह्यासाठी नवीन नियमावली लागू होताच पोलिस प्रशासनही action मोडवर आले असून बेकायदेशीर वर्तन करणा-यांविरुद्ध कारवाई केली जात आहे. अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू ठेवण्याचे आदेश आहेत.

    जळगाव (Jalgaon).  जिल्ह्यासाठी नवीन नियमावली लागू होताच पोलिस प्रशासनही action मोडवर आले असून बेकायदेशीर वर्तन करणा-यांविरुद्ध कारवाई केली जात आहे. अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. त्यानंतर सुरू राहणा-या प्रतिष्ठानांवर कारवाई केली जात आहे.

    पोलिस आणि नगरपरिषद प्रशासनाने जळगाव जामोद येथे अशा काही दुकाने बंद करवून घेतली. शहरामध्ये पोलिस गस्त घालत आहेत. विनाकारण फिरणारे, मास्कचा वापर न करणा-या व्यक्तींविरुद्ध कारवाई केली जात आहे. मेन रोडवरील टी पॉईंटवर येणा-या जाणा-या लोकांची तपासणी करण्यात आली. जळगाव जामोद पोलिस स्टेशनचे प्रभारी एपीआय. सतीश आडे आणि त्यांचे सहकारी बंदोबस्त सांभाळत आहेत.