काही लोकं व 500 हून अधिक गुरं वाहून गेल्याची शक्यता

चाळीसगाव तालुक्यातील या पुरात काही लोकांसोबतच व जवळपास ५०० ते ६०० जनावरे वाहून गेल्याची शक्यता आहे. लोकांची शेती वाहून गेली. हाता तोंडाशी आलेलं पीक गेलं. या पुरामुळे तालुक्याचं मोठं नुकसान झालं आहे. 

    ऑगस्ट महिन्यात दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार एंट्री घेत सर्वांचीच झोप उडवली आहे. या मुसळधार पावसने जळगावातील चाळीसगावात पूरस्थिथी निर्माण झाली होती. अचानक आलेल्या या जलसंकटामुळे परिसरातील नागरिकांसह प्रशासनाची धावपळ झाली असून, पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी एसडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे. या पावसामुळे परिसरातील शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

    या संदर्भात माहिती देताना आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की, “मी स्थानिकांशी बोललो. प्रशासकीय अधिकारी आणि मी आता घाटात आहोत. इथं मोठ्या दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे सध्यातरी रस्ता मोकळा करण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. सकाळपासून ३ ते ४ मृतदेह मी बघितले आहेत. त्यामुळे ८ ते १० लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्व प्रशासन कामाला लागलं आहे.” अशी प्रतिक्रिया दिली.

    चाळीसगाव तालुक्यातील या पुरात काही लोकांसोबतच व जवळपास ५०० ते ६०० जनावरे वाहून गेल्याची शक्यता आहे. लोकांची शेती वाहून गेली. हाता तोंडाशी आलेलं पीक गेलं. या पुरामुळे तालुक्याचं मोठं नुकसान झालं आहे.

    दरम्यान, आमदार चव्हाण यांच्या प्रतिक्रियेला चाळीसगाव प्रशासनाने देखील दुजोरा दिला असून काही भागांत अजूनही पाणी असल्याचं सांगण्यात येत आहे.