रतनलालजी बाफना, जळगाव
रतनलालजी बाफना, जळगाव

येथील प्रथितयश व्यवसायिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच गोसेवाप्रेमी रतनलाल सी बाफना यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. जळगाव जिल्ह्यासह देशातील अनेक सामाजिक कार्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. आर.सी.बाफना ज्वेलर्स परिवारावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी नयनतारा, भाऊ कस्तुरचंद, मुलगा सिद्धार्थ, सून, नातवंडे, पुतणे असा परिवार आहे .

जळगाव (Jalgaon).  येथील प्रथितयश व्यवसायिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच गोसेवाप्रेमी रतनलाल सी बाफना यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. जळगाव जिल्ह्यासह देशातील अनेक सामाजिक कार्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. आर.सी.बाफना ज्वेलर्स परिवारावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी नयनतारा, भाऊ कस्तुरचंद, मुलगा सिद्धार्थ, सून, नातवंडे, पुतणे असा परिवार आहे .

ते शाकाहार व गोप्रेमी म्हणून प्रसिध्द होते. अतिशय दानशूर म्हणून राज्यभरात प्रसिध्द होते. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्यावर शोककळा पसरली असून दातृत्व असलेले व्यक्तिमत्त्व जाण्यामुळे सामाजिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाबद्दल जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, दलुभाऊ जैन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह शासकीय अधिकाऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे.