कामयानी एक्स्प्रेसचे डबे घसरल्याची अफवा; अपघात नव्हेे तर रेल्वेचे मॉकड्रील

भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ, जळगाव स्थानकावरील अधिकारी अलर्ट आहेत की नाही, रेल्वेचा जर काही अपघात झाला तरी किती वेळात यंत्रणा पोहचते. यासाठी रेल्वे विभागाचे सोमवारी माॅकड्रील पार पडले.

प्रवासात नागरिक असलेले कामयानी एक्स्प्रेसचे डबे घरसल्याची माहिती देण्यात येऊन संबंधित यंत्रणांची चाचणी घेण्यात अाली. दरम्यान, अचानकच्या या प्रकारामुळे गाडीचे डबे घसरल्याची एक अफवा पसरली होती. मात्र रेल्वे प्रशासनाने हे अपघात नसून मॉक ड्रिल असल्याबाबत दुजोरा दिला आहे. या मॉक ड्रीलमुळे तब्बल एक तास कामयानी एक्स्प्रेस कुर्‍हादडा, कुरकुड नाला, दहा पूलाव परिसरात तब्बल एक तास थांबून होती. प्रवाशांमध्येमधेही अचानकच्या या प्रकाराने खळबळ उडाली होती.