संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपदाची आशा, जळगाव दौऱ्यावर असताना केलं ‘हे’ विधान

संजय राठोड जळगाव दौऱ्यावर(Sanjay Rathod In Jalgav) आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना मंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thakre) निर्णय घेतील, अशी आशा व्यक्त केली आहे.

    जळगाव: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी(Pooja Chavhan Suicide Case) शिवसेना नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड(Sanjay Rathod) यांना राजीनामा द्यावा लागला होता. पुणे पोलिसांनी(Pune Police) या प्रकरणात संजय राठोड यांना क्लीनचिट दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र यावरून मतमतांतरे असल्याचे पाहायला मिळत आहे. संजय राठोड जळगाव दौऱ्यावर(Sanjay Rathod In Jalgav) आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना मंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, अशी आशा व्यक्त केली आहे.

    मोदी सरकारच्या मंत्रीमंडळात मोठे फेरबदल केल्यानंतर आता राज्यातील ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळातही काही बदल केले जाणार असल्याची चर्चा आत्ताच्या घडीला राजकीय वर्तुळात चांगलीच रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून अनेक शक्यताही वर्तवल्या जात आहे. यातच राजीनामा द्यावा लागलेले माजी वनमंत्री संजय राठोड अजूनही मंत्रीमंडळाबाबत आशावादी असल्याचे पाहायला मिळत आहेत. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रीपदाबाबत अंतिम निर्णय घेतील, असे राठोड म्हणाले.

    मंत्रीपदाबाबत विरोधकांनी कितीही विरोध केला तरी अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असे संजय राठोड म्हणाले. आपल्या समाजाच्या प्रश्नासाठी संपूर्ण महराष्ट्रात फिरत आहोत. समाज बांधवांशी चर्चा करीत आहोत. त्यांना काय हवे नको, त्याकडे जातीने लक्ष घालत आहे, असे राठोड यांनी यावेळी नमूद केले. तसेच याबाबत आपण एकदा बोललो आहोत. प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू आहे. योग्य वेळ येईल, तेव्हा मी निश्तितपणे बोलेल, असे संजय राठोड यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील क्लीनचिटसंदर्भात बोलताना स्पष्ट केले.