Shame on Jalgaon Municipal Corporation for sealing bank accounts? 13 crore arrears of revenue department

महापालिकेकडे महसूल विभागाची अकृषक साऱ्याची 13 कोटी रुपयांची थकबाकी असल्याने महापालिकेचे बँक खाते गोठविण्याचे आदेश बँकांना उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिल्याने पुन्हा जळगाव मनपावर बँक खाती सील होण्याची नामुष्की ओढविण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    जळगाव : महापालिकेकडे महसूल विभागाची अकृषक साऱ्याची 13 कोटी रुपयांची थकबाकी असल्याने महापालिकेचे बँक खाते गोठविण्याचे आदेश बँकांना उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिल्याने पुन्हा जळगाव मनपावर बँक खाती सील होण्याची नामुष्की ओढविण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    दरम्यान, या साऱ्याच्या रक्कमेला महापालिका प्रशासनाने आक्षेप घतेला असून, खाते सील होणार नसल्याचा दावा मनपा प्रशासनाने केला आहे.

    महसूल विभागाने विविध अस्थापानाकडे थकबाकी वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. जळगाव महापालिकेकडेदेखील सन २००१ पासूनची अकृषक साऱ्याची १३ ते १४ कोटींची थकबाकी आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी महसूल विभागाने अनेकवेळा महापालिकेकडे पाठपुरावा करूनही भरणा न केल्याने विभागाने पालिकेची बँक खाती गोठविण्याचे आदेश संबधित बँकांना उपविभागीय अधिकारी धोडमिसे यांनी दिले आहेत. मात्र, खाती सील केली की नाही याची माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले.