या कारणामुळे रद्द झाला पवारांचा नियोजित खान्देश दौरा

एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला होता. तर रोहिणी खडसे यांच्या संपर्कात आल्याने एकनाथ खडसे यांनीदेखील स्वतःला क्वारंटाईन केले आहे. त्यामुळे येत्या २० आणि २१ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा नियोजित दौरा सध्या रद्द करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा रद्द केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे सध्या क्वारंटाईन असल्यामुळे दौरा रद्द केल्याची माहिती मिळत आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती. मत्र आता हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.

एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला होता. तर रोहिणी खडसे यांच्या संपर्कात आल्याने एकनाथ खडसे यांनीदेखील स्वतःला क्वारंटाईन केले आहे. त्यामुळे येत्या २० आणि २१ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा नियोजित दौरा सध्या रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे शक्तीप्रदर्शनाच्या तयारीत असलेल्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतरचा हा पहिलाच दौरा होता. त्यामुळे खडसे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने कार्यकर्ते या दोघांकडूनही जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी करण्यात आली होती. मात्र स्वतः एकनाथ खडसेच या दौऱ्यात सहभागी होऊ शकत नसल्याचं लक्षात आल्यामुळे हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

काही दिवसांनी पुन्हा एकदा या दौऱ्याचं नियोजन केलं जाईल, अशी माहिती मिळत आहे. मात्र त्याबाबतचा कुठलाही तपशील अद्याप निश्चितपणे ठरलेला नाही. दौऱ्याची तारीख किंवा ठिकाण याबाबत कुठलेही नियोजन अद्याप झालेले नसल्याची माहिती आहे.