धक्कादायक! खाऊचे आमिष दाखवून ५ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार ; शिरसगाव येथील घटना , नराधमास अटक

चाळीसगाव :  खाऊचे आमिष दाखवून ५ वर्षीय चिमुकलीवर ३७ वर्षीय नाराधमाने बलात्कार केल्याची घटना तालुक्यातील शिरसगाव येथे दि. ३ जानेवारी २०२१ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली असून मेहुनबारे पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तर आरोपीस मनमाड रेल्वे स्टेशन वरून ताब्यात घेतले आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील शिरसगाव येथील आरोपी संदीप सुदाम तिरामली (वय ३७) याने दि. 3 रोजी गावातीलच ५ वर्षीय मुलीला खाऊचे आमिष दाखवून घरात बोलावून रात्री ८ वाजेच्या सुमारास बलात्कार केला. सदर माहिती मुलीने घरात सांगितल्यावर त्यांनी लागलीच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नाराधमावर गुन्हा दाखल केला. तोवर आरोपी पळून गेला होता. स पो नि पवन देसले, उपनिरीक्षक हेमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार गोपाळ पाटील, हवालदार योगेश मांडोळे, पो कॉ शैलेश माळी, गोरख चकोर यांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीस मनमाड रेल्वे स्टेशनवरून अटक केली आहे.