धक्‍कादायक ! बाधितांना बेडसाठी ‘वेट ॲण्ड वॉच’; बेड शिल्‍लक नसल्‍याने पाठविले जातेय परत

कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्‍हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. कोरोनाच्या पहिल्‍या लाटेमध्ये जितके रूग्‍ण आठवडाभरात दुप्पट रूग्‍ण आढळून येत आहेत. यासाठीची उपाययोजना म्‍हणून अधिकाधिक बेडची व्यवस्था करत जिल्हा आरोग्य यंत्रणेने शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये दहा हजारांवर बेड उपलब्ध करून दिले आहेत. शिवाय पुरेसा स्टाफ, औषधांची व्यवस्था करण्यात आली आहे.

  जळगाव : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील सहा दिवसांपासून नऊशेच्यावर बाधित रुग्ण आढळत आहेत. यामुळे बेड देखील अपुर्ण पडत असल्‍याची स्थिती जळगावात निर्माण झाली आहे. परिणामी कोरोनाची लागण झालेल्‍या रूग्‍णांना बेडसाठी ‘वेट ॲण्ड वॉच’ करावे लागत आहे. आठवडाभरापासून जिल्‍ह्‍यातील बाधितांपैकी निम्‍मे संख्या ही जळगाव शहरातील आहे. यामुळे रूग्‍णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या देखील तुलनेत अधिक आहे.

  कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्‍हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. कोरोनाच्या पहिल्‍या लाटेमध्ये जितके रूग्‍ण आठवडाभरात दुप्पट रूग्‍ण आढळून येत आहेत. यासाठीची उपाययोजना म्‍हणून अधिकाधिक बेडची व्यवस्था करत जिल्हा आरोग्य यंत्रणेने शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये दहा हजारांवर बेड उपलब्ध करून दिले आहेत. शिवाय पुरेसा स्टाफ, औषधांची व्यवस्था करण्यात आली आहे.

  बेडसाठी प्रतिक्षा
  जिल्‍ह्‍यासह जळगाव शहरात कोरोना संसर्गाची वाढती रुग्णसंख्या धोकादायक ठरू लागली आहे. यावर उपाययोजना म्‍हणून तीन दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यात आला. परंतु याचा फारसा फरक जाणवून आलेला नाही. दरम्‍यान, आठवडाभरापासून जिल्‍ह्‍यातील बाधितांपैकी निम्‍मे संख्या ही जळगाव शहरातील आहे. यामुळे रूग्‍णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या देखील तुलनेत अधिक आहे. परिणामी अतिरिक्‍त करण्यात आलेले बेड फुल्‍ल झाल्‍यामुळे नवीन लागन झालेल्‍या रूग्‍णांना बेडच्या प्रतिक्षेत बाहेर थांबावे लागत आहे. ही परिस्थिती शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय, गोदावरी मेडिकल कॉलेजमध्ये आज पाहण्यास मिळाली.

  आणखी बेडची आवश्‍यकता
  जिल्ह्यात खासगी व शासकीय रुग्णालयांत दहा हजारांवर बेडची व्यवस्था केली आहे. त्यात दोन हजार बेड हे ऑक्सिजनयुक्त आहेत. सर्वच ठिकाणी व्हेंटिलेटरची सुविधा आहे. दरम्‍यान, तालुकास्‍तरावरील रूग्‍णालयांमध्ये बेड काही प्रमाणात कमी आहेत. परंतु, जळगाव शहरात बाधितांची संख्या अधिक असल्‍याने सर्वच सेंटरवर आणखी अतिरिक्‍त बेडची सुविधा करावी लागणार असल्‍याचे चित्र निर्माण झाले आहे.

  पाच दिवसातील बाधित रुग्ण असे
  ९ मार्च — ६०५
  १० मार्च — ९८३
  ११ मार्च — ९५४
  १३ मार्च — ९८२
  १४ मार्च — ९७९
  १५ मार्च — ९९२