साेशल मीडियावर तुफान चर्चा…नाथाभाऊंच्या मनात अजूनही कमळच!

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या रक्षा खडसे यांच्या घरातील घड्याळाचा छायाचित्रात हे घड्याळ कमळाच्या आकाराचे असून, या घड्याळामध्ये एकनाथ खडसेचेही छायािचत्र आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या खडसेंचे छायाचित्र कमळाच्या घड्याळामध्ये असल्याने नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

    जळगाव : गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे अताेनात नुकसान झाले आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला दिलासा मिळावा, यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नुकसानीची पाहणी करण्यासाठी जळगाव दौर्‍यावर आहेत. या दाैऱ्यादरम्यान त्यांनी खासदार रक्षा खडसे यांच्या निवासस्थानी जावून त्‍यांची सदिच्छा भेट घेतली. मात्र, राजकीय वर्तुळात भेटीपेक्षा खडसे यांच्या घरी लावलेल्या घड्याळाची चर्चा अधिक रंगली आहे.

    गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांनी खान्देशात भाजपाला खिंडार पाडायला सुरूवात केली आहे. त्यात आता शिवसेनेनेही उडी घेतली. भाजपाच्या काही नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने भाजपाची नगरपािलकेतील सत्ता गेली. या पार्श्वभूमीवर रक्षा खडसे आणि फडणवीस यांच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच फडणवीस यांनी कालच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली हाेती. त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व हाेते. मात्र यापेक्षाही नाथाभाऊंच्या घरात कमळावर असलेल्या घड्याळाचे चित्र साेशल मीडियात व्हायरल झाले आणि साेशल मीडियात फडणवीस-खडसे भेटीपेक्षा या चित्रालाच जास्त महत्त्व प्राप्त झाले.

    दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या रक्षा खडसे यांच्या घरातील घड्याळाचा छायाचित्रात हे घड्याळ कमळाच्या आकाराचे असून, या घड्याळामध्ये एकनाथ खडसेचेही छायािचत्र आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या खडसेंचे छायाचित्र कमळाच्या घड्याळामध्ये असल्याने नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.