अजब भेट ! जळगाव मनपा आयुक्तांना नगरसेवकाने भर सभेत स्थायी भेट म्हणून दिले भटके कुत्रे

जळगाव : शहरातील भटक्या कुत्र्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे, तक्रार करूनही महापालिका प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळे जळगाव महापालिकेतील शिवसेना नगरसेवकांनी आयुक्तांना स्थायी समितीच्या सभेत थेट भटके कुत्रे भेट दिले.

जळगाव : शहरातील भटक्या कुत्र्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे, तक्रार करूनही महापालिका प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळे जळगाव महापालिकेतील शिवसेना नगरसेवकांनी आयुक्तांना स्थायी समितीच्या सभेत थेट भटके कुत्रे भेट दिले.जळगाव शहरात गेल्या अनेक दिवसापासून भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. अनेकांना चावा घेवून त्यांनी जखमी केले आहे. याबाबत शहरातील नागरिकांनी थेट केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्याकडे तक्रार केली, त्यानुसार त्यांनी दखल घेतली आहे. मात्र या ठिकाणी असलेल्या मक्तेदाराबाबत तक्रारी असल्यामुळे केंद्रांतील समितीच्या आदेशानुसार भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताचे काम स्थगित करण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

प्रशासनाने काम स्थगित केल्यामुळे शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. प्रत्येक भागात भटक्या कुत्र्यांचा नागरिकांना त्रास होत आहे. अनेक भागात लहान मुलांनाही या भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने ते जखमी झाले आहेत.त्यामुळे नागरिकामंध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहेत.

स्थायी सभेत कुत्रे भेट
महापालिकेची आज स्थायी समितीची सभा सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आयुक्त डॉ.सतीश कुळकर्णी उपस्थित होते. शिवसेनेचे नगरसेवक व स्थायी समिती सदस्य प्रशांत नाईक यांनी आज भटक्या कुत्र्यांचे दोन पिले आणून स्थायी समितीच्या सभेत महापालिका आयुक्तांना भेट दिले. त्यामुळे संपूर्ण सभागृह अवाक झाले. याबाबत बोलतांना प्रशांत नाईक म्हणाले, कि शहरातील नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा त्रास होत आहे. अनेक वेळा तक्रार करूनही प्रशासन काहीतरी थातूर मातून कारणे सांगून कारवाई टाळत आ