कोरोनामुक्त बालकांमध्ये ‘MISS’ नावाच्या आजाराची लक्षणं, पालकांच्या चिंतेत वाढ

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्व सामान्य जनता चांगलीच अडचणीत आल्याचं पाहायला मिळाले होते. या लाटेत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तर अनेकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे.

    जळगाव : कोरोना (Corona Virus) होऊन गेल्यानंतर काही दिवसांनी काही लहान बालकांमध्ये मिस म्हणजेच मल्टी सिस्टम इफ्लेमेटरी सिंड्रोम (multi system inflammatory syndrome) नावाचा आजार होत असल्याचं समोर आले आहे. जळगाव जिल्ह्यात (Jalgaon Corona Update) गेल्या काही दिवसात अशा 15 रुग्णांची नोंद करण्यात आल्याने प्रशासनासह पालकांच्या मध्ये चिंतेचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे.

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्व सामान्य जनता चांगलीच अडचणीत आल्याचं पाहायला मिळाले होते. या लाटेत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तर अनेकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे.

    कोरोनाची दुसरी लाट गेल्या काही दिवसात ओसरत असल्याचं चित्र असताना मोठ्या माणसात म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण वाढत असल्याचं बघायला मिळत आहे. एकीकडे असे चित्र असताना आणि कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    आता त्यात लहान मुलांना अधिक धोका होऊ शकतो अशी शक्यता वर्तविली जात असतानाच या लाटेच्या अगोदरच मिस् म्हणजेच मल्टी सिस्टम इफ्लेमेटरी सिंड्रोम नावाच्या आजाराचे रुग्ण जळगाव जिल्ह्यात आढळून आल्याने प्रशासन आणि पालकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरले असल्याचं पाहायला मिळाले आहे.