पत्नी आणि मुलीसह तापी पुलावरून नदीत उडी घेतली; भाजपा उपाध्यक्षाच्या आत्महत्येने हादरले जळगाव

धरणगाव (Dharangaon) तालुक्यातील सावळदे गावाजवळ असलेल्या पुलावरून तापी नदीत (Tapi river) उडी घेऊन एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत झालेल्यांमध्ये पती-पत्नी व मुलीचा समावेश आहे. हे तिघे भोद येथील रहिवासी (residents of Bhod) आहेत. याप्रकरणी थाळनेर पोलीस ठाण्यात (Thalner police station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    धरणगाव (Dharangaon).  तालुक्यातील सावळदे गावाजवळ असलेल्या पुलावरून तापी नदीत (Tapi river) उडी घेऊन एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत झालेल्यांमध्ये पती-पत्नी व मुलीचा समावेश आहे. हे तिघे भोद येथील रहिवासी (residents of Bhod) आहेत. याप्रकरणी थाळनेर पोलीस ठाण्यात (Thalner police station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एकाच कुटुंबातील तिघांनी सामूहिक आत्महत्या (The mass suicide of three members) केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्येमागील कारण मात्र समजू शकले नाही.

    जळगाव जिल्ह्यातील भोद येथील रहिवासी, एरंडोल तालुका शेतकी संघाचे संचालक तथा भाजपचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र रायभान देसले (वय ५४), त्यांची पत्नी वंदनाबाई देसले (४८) व मुलगी ज्ञानल (२१) या तिघांनी सावळदे गावाजवळ असलेल्या पुलावरून तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली.

    दि.१७ रोजी रात्री सावळदे गावाजवळ असलेल्या तापी नदीच्या पुलावर इंडिका कार (एमएच १९/ पीए-१०९४) संशयितरीत्या उभी असल्याचे आढळून आले. नागरिकांना संशय आल्याने त्यांनी ही माहिती पोलिसांना कळविली. यानंतर थाळनेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कारच्या क्रमांकावरून तपास केला तेंव्हा राजेंद्र देसलेंचे नाव समोर आले.

    दरम्यान, नागरिकांनी तिघांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केल्याने शोध मोहीम हाती घेण्यात आली. दि. १८ रोजी शोध मोहीम सुरू असताना सायंकाळी तिघांचे मृतदेह नदी पात्रात पाण्यावर तरंगताना आढळून आले. हे मृतदेह नागरिकांच्या मदतीने बाहेर काढून थाळनेर पोलिसांनी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. याप्रकरणी थाळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    दरम्यान, समजलेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील भोद येथील राजेंद्र रायभान देसले हे पत्नी वंदनाबाई देसले व मुलगी ज्ञानलसह इंडिका कारने अमळनेर तालुक्यातील भरवस येथे नातेवाइकांकडे कार्यक्रमानिमित्ताने आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर मुक्काम करून दुसऱ्या दिवशी दि.१७ मे रोजी ते घरी जाण्यासाठी निघाले; परंतु त्यांनी धरणगावकडे जाण्याचा रस्ता सोडून उलट्या दिशेने प्रवास करीत तापी नदीच्या पुलावर गाडी थांबवून तिघांनी एकाच वेळी आत्महत्या केली. अद्याप तिघांनी सामूहिक आत्महत्या का केली? याचे कारण समजू शकले नाही.