आघाडी सरकार म्हणजे पाण्यात बसलेली म्हैस; विनायक मेटेंची जहरी टीका

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकनाट्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालेले असतानाच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार विनायक मेटे यांनी पुन्हा ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हणजे पाण्यात बसलेली म्हैस आहे. या सरकारच्या नाकर्तेपणामुळेच मराठा आरक्षण रद्द झाल्याचा आरोप विनायक मेटे यांनी जळगावात एका पत्रकार परिषदेत केला.

    जळगाव : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकनाट्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालेले असतानाच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार विनायक मेटे यांनी पुन्हा ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हणजे पाण्यात बसलेली म्हैस आहे. या सरकारच्या नाकर्तेपणामुळेच मराठा आरक्षण रद्द झाल्याचा आरोप विनायक मेटे यांनी जळगावात एका पत्रकार परिषदेत केला.

    फडणवीस सरकारच्या काळात मराठा आरक्षणाच्या संघर्षाला यश आले. पण, त्यानतंर आलेले ठाकरे सरकार सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकवण्यात अपयशी ठरले. 2 सप्टेंबरपर्यंत राज्य सरकारला अल्टीमेटम दिला असून त्यानतंर राज्यभरात मराठा समाज आंदोलनासाठी रस्त्यावर उतरणार आहे, असा इशारादेखील आमदार मेटे यांनी दिला.

    मराठा आरक्षणाच्या बाबतीत कुठलाही निर्णय न घेणारे ठाकरे सरकार म्हणजे पाण्यात बसलेली म्हैस आहे. या म्हशीला आता टोचण्यासाठी शिवसंग्राम संघटनेसह मराठा समाजाची बैठक झाली आहे. त्यानुसार ठाकरे सरकारला 2 सप्टेंबरपर्यंतचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. तोपर्यंत आरक्षणाची मागणी पूर्ण न झाल्यास 2 सप्टेंबरला राज्यभर धरणे आंदोलन, त्यानतंर मेळावे व मोर्चे काढण्यात येतील. गणपती विसर्जनानतंर मुंबईत मराठा समाज उपोषणाला बसणार असून आरक्षण मिळाल्याशिवाय हे उपोषण थांबणार नाही असे विनायक मेटे म्हणाले.