जळगाव मधील बहुचर्चित BHR घोटाळा; मुख्य संशयित आरोपी जितेंद्र कंडारेला इंदोरमधून अटक

गेल्या सात महिन्यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने BHR घोटाळ्याप्रकरणी धाडसत्र राबविले होते. यावेळी अनेक संशयितांना अटक करण्यात आली. परंतु मुख्य संशयित सुनील झंवर व अवसायक जितेंद्र खंडारे हे फरार झाले होते. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने राज्यासह परराज्यात देखील यांच्या शोधार्थ पथके पाठवली होती.

    जळगाव : BHR घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी तथा अवसायक जितेंद्र कंडारे यास पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने इंदोरमधून अटक केली आहे. दरम्यान, कंडारेच्या अटकेमुळे या घोटाळ्यातील अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

    गेल्या सात महिन्यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने BHR घोटाळ्याप्रकरणी धाडसत्र राबविले होते. यावेळी अनेक संशयितांना अटक करण्यात आली. परंतु मुख्य संशयित सुनील झंवर व अवसायक जितेंद्र खंडारे हे फरार झाले होते. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने राज्यासह परराज्यात देखील यांच्या शोधार्थ पथके पाठवली होती.

    आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने सापळा रचून इंदोर मधून कंडारेना अटक करण्यात यश आले आहे. दरम्यान, कंडारेच्या अटकेमुळे BHR घोटाळ्यातील अनेक बाबींचा लवकरच उलगडा होण्याची शक्यता आहे. तसेच सुनील झंवर यांनाही अटक होऊ शकते.