पोळा सण यंदाही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या सावटाखाली; शेतकऱ्यांच्या उत्साहावर विरजण

तुरळक शेतकरी सध्या आपल्या सर्जाराजासाठीचे सजावटचे साहित्य खरेदी करताना दिसून येत आहे; मात्र जो उत्साह पूर्वी पोळा सणासुदीच्या दिवसात दिसत असे तो कोरोनाची तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्यामुळे दिसून येत नाही.

    जळगाव (Jalgaon) : गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगावर कोरोना या महामारीने (The Corona epidemic) थैमान घातले आहे. अशातच सण व उत्सवांना राज्याने निर्बंध (the restrictions of the state) घातल्यामुळे शेतकऱ्यांचा सर्वांत आवडता सण (the most popular festival of the farmers) पोळा असून अवघ्या दोन दिवसांवर पोळा सण (the Pola festival) येथून ठेपला आहे. तरी देखील बाजारात कमालीची शांतता बघावयास मिळत आहे.

    एकीकडे गेल्या १५ दिवसांपासून व्यावसायिकांनी बैल पोळा सणासाठी आपली दुकाने थाटून ठेवली आहेत; परंतु पाचोरा तालुका व परिसरात पोळा सण उत्साहात साजरा न करता शांततेतच व आप-आपल्या घरीच साजरा करावा, असे आदेश प्रशासनातर्फे काढण्यात आले आहेत. म्हणूनच शेतकऱ्यांमध्ये यावर्षीही कमालीचा नाराजीचा सूर दिसून येत आहे.

    तुरळक शेतकरी सध्या आपल्या सर्जाराजासाठीचे सजावटचे साहित्य खरेदी करताना दिसून येत आहे. मात्र जो उत्साह पूर्वी पोळा सणासुदीच्या दिवसात दिसत असे तोच उत्साहाचे वातावरण सध्या तरी कोरोनाची तिसरी लाटेच्या संभाव्य धोक्यामुळे दिसून येत नाही. त्यामुळे याचा परिणाम हा व्यवसायिकावर देखील झाला आहे.