Thousands throng Jalgaon NCP leader's funeral procession; Trampling on corona rules

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांचे रात्री हृदय विकाराच्या झटक्याने जळगावात निधन झाले. मलिक यांच्या अंत्ययात्रेत हजारोंच्या संख्येत कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. अंत्ययात्रेत प्रसंगी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज फाटा तैनात होता. मात्र, पोलिसांसमोरच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली करण्यात आली.

    जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांचे रात्री हृदय विकाराच्या झटक्याने जळगावात निधन झाले. मलिक यांच्या अंत्ययात्रेत हजारोंच्या संख्येत कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. अंत्ययात्रेत प्रसंगी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज फाटा तैनात होता. मात्र, पोलिसांसमोरच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली करण्यात आली.

    प्रशासनाला गर्दीला आवर घालण्यास सपशेल अपयश आल्याचे दिसून आले. अंत्ययात्रेत मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. यावेळी कोरोना नियमांची पायमल्ली करण्यात आली. असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी विनामास्क फिरत असल्याचे दिसून आले.

    मात्र, राजकीय नेत्याच्या अंत्ययात्रेप्रसंगी कोरोना प्रतिबंधक नियमांची पायमल्ली होत असताना पोलिस देखील हतबल झाल्याचे पाहायला मिळाले.