हिवरा नदीत ३ बालके गेली वाहून, एकाचा आढळला मृतदेह

  • हिवरा नदीच्या क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने हिवरा धरण भरले आहे. त्यामुळे नदीची पाण्याची पातळी अचानक वाढली आणि बालकं वाहून गेली. तेथील पट्टीच्या पोहणाऱ्यांना बोलवून बालकांचा शोध सुरु केला त्यातील १ बालकाचा मृतदेह सापडला आहे. संध्याकाळी अंधार झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले होते. नदीकाठी गावातील बघ्यांची तुफान गर्दी झाली होती,

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील हिवरा नदीला पुर आल्याने नदीमध्ये पोहणारे तीन बालकं वाहून गेले आहेत. नदीकाठावरील वस्तीतील तीन बालके पोहत होते. अचानक नदीला पुर आल्याने ३ मुले वाहून गेली. पट्टीच्या पोहणाऱ्यांना सांगून शोधमोहीम सुरु केली असता १ बालकाचा मृतदेह सापडला आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली आहे.

हिवरा नदीच्या क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने हिवरा धरण भरले आहे. त्यामुळे नदीची पाण्याची पातळी अचानक वाढली आणि बालकं वाहून गेली. तेथील पट्टीच्या पोहणाऱ्यांना बोलवून बालकांचा शोध सुरु केला त्यातील १ बालकाचा मृतदेह सापडला आहे. संध्याकाळी अंधार झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले होते. नदीकाठी गावातील बघ्यांची तुफान गर्दी झाली होती.