जळगाव जिल्हा कारागृहातून तीन कैदी फरार ?

  • दररोज सकाळी कामांसाठी ज्याप्रमाणे कैदींना सोडले जाते. त्याचप्रमाणे आज देखील सोडण्यात आले होते. परंतु सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून हे तीन कैदी आज सकाळी साडेसात वाजता पळाले.

जळगाव जिल्हा कारागृहातून तीन कैदी पळाल्याची घटना आज शनिवारी सकाळी घडली. तसेच या तीन संशयितांमध्ये एका बडतर्फ पोलिसाचा देखील समावेश असल्याचं सांगतिलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दररोज सकाळी कामांसाठी ज्याप्रमाणे कैदींना सोडले जाते. त्याचप्रमाणे आज देखील सोडण्यात आले होते. परंतु सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून हे तीन कैदी आज सकाळी साडेसात वाजता पळाले.

जिल्हा कारागृहातून फरार झालेल्या कैद्यांची नावे सुशील अशोक मगरे (रा. पहूर, ता. जामनेर), गौरव विजय पाटील (रा. तांबापुरा, अमळनेर) आणि सागर संजय पाटील (रा. पैलाड, अमळनेर) अशी आहेत. कैदी सुशील अशोक मगरे (रा. पहूर, ता. जामनेर) याला पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले होते. तसेच पुण्यातील एका दुकानात दरोडा टाकल्यामुळे त्याला एलसीबीच्या पथकाने डिसेंबर २०१९ मध्ये बडोदा येथून अटक केली होती.

दरम्यान, जळगाव जिल्हा कारागृहात दुहेरी सुरक्षा व्यवस्था असताना हे तीन कैदी पळाले कसे? या मागील नेमके काय कारण आहे, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी पुण्यातील येरवडा कारागृहातून मोक्काच्या गुन्ह्यातील पाच कैदी फरार झाले होते. हे पाच जण इमारतीच्या खिडकीचा गज कापून मध्यरात्रीच्या सुमारास पळून गेले होते. परंतु या पाचही आरोपींविरोधात येरवडा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता.