आज जळगाव जिल्ह्यात कोरोनामुळे २४ रुग्णांचा मृत्यू तर बरं होण्याचे प्रमाण मात्र वाढले

आज जिल्ह्यात बाधित रूग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या अधिक असल्याने ॲक्टिव्ह रूग्णांची संख्या घटली ही बाब जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे. आज २४ जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतचा हा मृत्यूचा सर्वाधिक आकडा आहे.

    जळगाव : जिल्ह्यात आज दिवसभरात १२०९ रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत ९७३६२ रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या १११०७ ॲक्टिव्ह रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात ११४७ नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या ११०४२४ झाली. जिल्ह्यात आज २४ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत १९५५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे

    मात्र आज जिल्ह्यात बाधित रूग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या अधिक असल्याने ॲक्टिव्ह रूग्णांची संख्या घटली ही बाब जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे. आज २४ जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतचा हा मृत्यूचा सर्वाधिक आकडा आहे.

    जळगाव शहर २३६, जळगाव ग्रामीण ३४, भुसावळ १५३, अमळनेर ३८, चोपडा १२४, पाचोरा २५, भडगाव १९, धरणगाव ३८, यावल ४३, एरोंडल ७२, जामनेर ५५, रावेर १३९, पारोळा २७, चाळीसगाव ५५, मुक्ताईनगर ४१, बोदवड ३६, इतर जिल्हातील १२ असे रुग्ण आढळून आले आहेत.