जळगावात कोरोनाचा उद्रेक, जिल्ह्यात आज पुन्हा १२२३ कोरोना बाधित रुग्णांची नोंदणी १३ बाधिताचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यात सध्या १०२७९ रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात १२२३ नवीन बाधित रूग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या ८०७८६ झाली असून आज पर्यंत १५२६ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे . आज १३ बाधिताचा मृत्यू झाला आहे.

    जळगाव : जिल्ह्यात आज दिवसभरात ९०८ रूग्ण उपचारात बरे होऊन घरी गेले . जिल्ह्यात आतापर्यंत उपचार घेऊन बरे होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या ६८९८१ आहे . जिल्ह्यात सध्या १०२७९ रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात १२२३ नवीन बाधित रूग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या ८०७८६ झाली असून आज पर्यंत १५२६ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे . आज १३ बाधिताचा मृत्यू झाला आहे.

    जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहिती नुसार जिल्ह्यात आज १२२३ रूग्ण बाधित आढळूनआले आहेत . यात जळगाव २४८ शहरातील आहेत.
    असे आढळले रुग्ण:-

    तालुका निहाय बाधित रुग्णाची आकडेवारी जळगाव ग्रामिण १३ , भुसावळ १३५, अमळनेर १५३ , चोपडा ३३८ ,पाचोरा ०३ , भडगाव ३० ,धरणगाव ३१, यावल ४५, एरंडोल २९, जामनेर ६५ , रावेर १९ ,पारोळा ३४ ,चाळीसगांव २३, मुक्ताईनगर २९, बोदवड २७, इतर जिल्ह्यातील ०१ असे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.