महिलेचा मृतदेह पळवून नेला, अन् अख्खं गाव धावत सुटलं

जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथे आयशर ट्रक उलटून 15 जणांचा मृत्यू झाल्याच्या बातमीने लोकांना धक्काच बसला आहे. या अपघातातील मृत 10 जण रावेर तालुक्यातील अभोडा गावातील रहिवासी होते. जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथे आयरश ट्रक उलटून 15 जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव हादरून गेले. घटनेनंतर एका महिलेचा मृतदेह अॅम्युबलन्समधून पळवून नेण्याचा प्रयत्न झाला.

    जळगाव (Jalgaon). जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथे आयशर ट्रक उलटून 15 जणांचा मृत्यू झाल्याच्या बातमीने लोकांना धक्काच बसला आहे. या अपघातातील मृत 10 जण रावेर तालुक्यातील अभोडा गावातील रहिवासी होते. जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथे आयरश ट्रक उलटून 15 जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव हादरून गेले. घटनेनंतर एका महिलेचा मृतदेह अॅम्युबलन्समधून पळवून नेण्याचा प्रयत्न झाला. ही बातमी कळताच संपूर्ण गावकरी अॅम्ब्युलन्समागे धावत सुटले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

    हा एका महिलेचा मृतदेह आहे. ही विवाहित महिला आपल्या माहेरीच राहत होती. 3 वर्षांपूर्वी सासरच्या मंडळींनी महिलेला राहू देण्यास नकार दिल्याने ती आपल्या माहेरी राहत होती. अपघातात या विवाहितेचा मृत्यू झाल्याने सदर महिलेचा मृतदेह आभोडा या गावी आणण्यात आला होता. मात्र त्याचवेळी विवाहितेची सासरची मंडळी तेथे हजर होती.

    या महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सासरी करण्याची मागणी करू लागले. यास विरोध करत अभोडा गावातील महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला. विरोध होत असल्याने सासरच्या मंडळींनी रुग्णवाहिकेद्वारे मृतदेह पळवून नेण्याचा प्रयत्न केला. गावातली शेकडो महिलांनी अक्षरशः रुग्णवाहिकेच्या मागे धावत जाऊन रुग्णवाहिका अडवली. सदर घटनेनं गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता. एकीकडे संपूर्ण गावात दुःखाचे वातावरण त्यात विवाहितेच्या सासरच्या मंडळींनी केलेल्या या कृत्यामुळे संपूर्ण गावात संताप व्यक्त होत आहे.