आता घटस्थापना नव्हे तर विजयादशमी?, एकनाथ खडसेंचे पक्षांतर लांबणार

गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादीत जाणार म्हणून चर्चा सुरु आहे. या चर्चेत त्यांचे समर्थक आणखी भर घालीत आहेत. त्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ते पक्षांतर करतीलच असे सांगितल्याने उत्सुकता वाढली आहे. जामनेरच्या ग्लोबल हॉस्पिटलच्या उदघाटन कार्यक्रमाला देखील जाणे खडसेंनी टाळले. तेथे देवेंद्र फडणवीस-खडसे भेट झाली नाही.

जळगाव : राज्याचे माजी महसूल मंत्री, माजी विरोधी पक्षनेते आणि अनेक दिवसांपासून ज्यांच्याभोवती चर्चेचे वलय निर्माण झाले आहे असे एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा घटस्थापनेचा मुहूर्त आता बदलला असल्याची माहिती मिळत असून विजयादशमीच्या दिवशी ते राष्ट्रवादीत (NCP) पक्षप्रवेश करतील अशी नवीन माहिती हाती आली आहे. विजयादशमीच्या दिवशी ते नेमके कोणते सोने लुटणार, कोणत्या रावणाचे दहन करणार याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र स्वतः एकनाथ खडसे यांनी, चुकीची माहिती आहे, अजून काही नाही अशी सावध प्रतिक्रिया देत पक्षांतराविषयी अद्यापही बोलणे टाळले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादीत जाणार म्हणून चर्चा सुरु आहे. या चर्चेत त्यांचे समर्थक आणखी भर घालीत आहेत. त्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ते पक्षांतर करतीलच असे सांगितल्याने उत्सुकता वाढली आहे. जामनेरच्या ग्लोबल हॉस्पिटलच्या उदघाटन कार्यक्रमाला देखील जाणे खडसेंनी टाळले. तेथे देवेंद्र फडणवीस-खडसे भेट झाली नाही. त्यात गुरुवारी १५ रोजी राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते खडसेंच्या भेटीला गेले आणि नाथाभाऊ राष्ट्रवादीत या अशी मागणी केली.

भारतीय जनता पक्षाचे गेली ४० वर्षे निष्ठावंत असलेले खडसे आज मात्र पक्षात एकाकी पडले असल्याचे दिसून येत आहे. पक्षाने अलीकडे त्यांना विधानसभा, विधानपरिषद, राज्यसभा, राज्यपाल यासह राष्ट्रीय कार्यकारिणी यापैकी कोठेच स्थान दिले नाही. लालकृष्ण अडवाणी यांच्याप्रमाणे अगदी अलगद बाजूला ठेवण्यात आले. मात्र मंत्री म्हणून आणि विरोधी पक्षनेता म्हणून सभागृह दणाणून सोडणारे नाथाभाऊ आज भाजपाला का नकोसे झाले त्याचे उत्तर भाजपा देत नाह