शिवराज नारियलवाले मारहाण प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह ५ कर्मचारी निलंबित…

पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांनी भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी मारहाण प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक भागवत कदम, पोलिस कर्मचारी सोमनाथ लहानगे, नंदकिशोर ढाकणे, सुमित सोळंके, महेंद्र भारसाकळे यांना निलंबित केले आहे.

    जालना : भाजप युवा मोर्चा पदाधिकारी शिवराज नारियालवले यांना काठी तुटे पर्यंत मारहाण करतांनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वच वृत्तपत्रानी प्रकरण लावून धरताच भाजप नेते फडणवीस व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी तात्काळ दोषी पोलिसांविरुद्ध कारवाईची मागणी केली दरम्यान 24 तास उलटत नाही तर जालना जिल्हा पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांनी पोलीस उपनिरिक्षक सह पाच जणांना तडकाफडकी निलंबित केल्याने पोलीस वर्तुळात खळबळ माजली आहे.

    दरम्यान जालना येथील भाजप युवा मोर्चा पदाधिकारी शिवराज नारियालवाले यांना 9 एप्रिल रोजी शिवीगाळ करतांनाच चित्रीकरण केलं म्हणून लाचखोर पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर,पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी काठ्या तुटेपर्यंत बेदम मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली व 27 मे रोजी मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला असता माजी मुख्यमंत्री फडणवीस,चित्रा वाघ व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी कारवाईची मागणी केली.

    त्यामुळे 28 मे रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांनी भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी मारहाण प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक भागवत कदम, पोलिस कर्मचारी सोमनाथ लहानगे, नंदकिशोर ढाकणे, सुमित सोळंके, महेंद्र भारसाकळे यांना निलंबित केले आहे.

    काय आहे प्रकरण ?

    शिवराज नारियलवाले हे 9 एप्रिल रोजी दीपक हॉस्पिटलमध्ये आपल्या बहिणीला उपचारासाठी घेऊन गेले होते. त्याचसुमारास गवळी समाजाचा एका युवकाचा अपघाती मृत्यू तेथे झाला आणि त्यामुळे तेथे काही लोक तेथे धुडघूस घालत होते. त्यावेळी तेथे उपस्थित काही पोलीस हे अतिशय अर्वाच्य शब्दात शिविगाळ करीत असल्याने शिवराज नारियलवाले यांनी पोलिसांची ही शिविगाळ आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केली. व्हीडिओ काढल्याच्या रागातून पण, त्यांना त्याची जी जबर शिक्षा उपस्थित पोलिसांनी दिली, ते या व्हीडिओतून दिसून येते. गणवेशातील 6 आणि गणवेशात नसलेले 2 असे आठ पोलिस त्यांना घेरून अमानूष मारहाण करीत होते. अगदी डोक्यावर सुद्धा मारहाण करण्यात आली. असे व्हायरल व्हीडिओत स्पष्ट दिसत आहे.  याप्रकरणी आता जालना पोलीस अधिक्षक यांनी संबधितांवर निलंबनाची कारवाई केली आहे.