रावसाहेब दानवे यांची सभा उधळन्याच्या तयारीत असलेले काँग्रेसचे ८-१० कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, अंबड मधील घटना.

दानवे यांनी राहुल गांधी यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त विधाना प्रकरणी माफी मागावी अन्यथा त्यांची सभा उधळून लावू असा ईशारां अंबडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्यानंतर आज अंबड पोलीसांनी काँग्रेसच्या ८-१० कार्यकर्त्यांना दानवे शहरात येण्याआधीच ताब्यात घेतलं आहे.

    जालना: जालन्यातील अंबड शहरात आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा नागरी सत्कार केला जाणार आहे.त्या पार्श्वभूमीवर अंबड पोलिसांनी काँग्रेसच्या ८ ते १० कार्यकर्त्यांना आधीच ताब्यात घेतल आहे. बदनापूर येथील सभेत दानवे यांनी राहुल गांधी सांड असल्याचा उल्लेख केला होता.यामुळे दानवे यांचा निषेध म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी दानवे यांचा पुतळा जाळला होता.


    दानवे यांनी राहुल गांधी यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त विधाना प्रकरणी माफी मागावी अन्यथा त्यांची सभा उधळून लावू असा ईशारां अंबडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्यानंतर आज अंबड पोलीसांनी काँग्रेसच्या ८-१० कार्यकर्त्यांना दानवे शहरात येण्याआधीच ताब्यात घेतलं आहे.ताब्यात घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी पोलिस ठाण्यात बसवून ठेवलं आहे.