मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्यासाठी लाक्षणिक उपोषण; मराठा क्रांती मोर्चाची आक्रमक भूमिका

जालना : मंत्री विजय वडेट्टीवार यांनी त्वरित राजीनामा द्यावा या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाची आक्रमक भूमिका पहायला मिळत आहे. राजीनाम्याच्या मागणीसाठी गुरुवारी सकाळी विभागीय आयुक्त कार्यालय समोर लाक्षणिक उपोषणही करण्यात आले.

जालना येथील कार्यक्रमात राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी न्यायमूर्ती एम जी गायकवाड आयोगाचा अहवाल बोगस असल्याचे म्हंटले होते असा आरोप होत आहे. वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावरून मराठा समाज आक्रमक झाला असून या वक्तव्याचा निषेध केला जात आहे.
घटनात्मक अधिकार नाकारून बोगस म्हणणारे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांआधी ओबीसी समाजाची (OBC Marcha) स्वतंत्रपणे जनगणना व्हावी, या मागणीसाठी रविवारी जालन्यात महामोर्चा काढण्यात आला होता. या महामोर्चात अनेक प्रमुख ओबीसी नेते सहभागी झाले होते. यावेळी मोर्चेकऱ्यांनी ‘आता मुख्यमंत्री ओबीसीचाच’ असे बॅनर्स झळकावले. तसेच आगामी काळात या मुद्द्यावरुन आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला. मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मध्यस्तीमुळे या महामोर्चाला परवानगी देण्यात आली होती.