देव तारी त्याला कोण मारी ; पांढुर्णा जवळील भररस्त्यात वाघाचा हल्ला

पांढुर्णा (Pandhurna) प्रवासी निवार्यात नजीक धाडी येथील आठवडी बाजार आटोपून सायंकाळी आष्टी (Ashti)येथे घरी दुचाकीने परत जात असताना दोन इसमावर (two person) अचानक वाघाने हल्ला ( a tiger attack ) करून किरकोळ जखमी केले.

 साहूर : नजीकच असलेल्या धाडी, पांढुर्णा (Pandhurna) प्रवासी निवार्यात नजीक धाडी येथील आठवडी बाजार आटोपून सायंकाळी आष्टी (Ashti)येथे घरी दुचाकीने परत जात असताना दोन इसमावर (two person) अचानक वाघाने हल्ला ( a tiger attack ) करून किरकोळ जखमी केले. धाडी (Dhadi) येथे आठवडी असल्याने आष्टी येथून भाजीपाला विक्रीकरिता आलेल्या जहागीर बॅग व अंदाजे ४० वर्ष राहणारा आष्टी, व आवेज बॅग वय अंदाजे २० वर्ष राहणार आष्टी हे बाजार आटपून रात्री आठ वाजताचे दरम्यान स्वतःचे दुचाकी क्रमांक एम एच ४९ ए एन ९५,१० या वाहनाने आष्टी ते परत जात असताना तेलाई घाटाजवळ असलेल्या पांडुरना बसस्थानकाजवळ अचानक धावत्या दुचाकीवर वाघाने झडप घातली. मात्र दुचाकी पुढे निघून गेल्याने दोन्ही युवक वाघाच्या हल्ल्यात किरकोळ जखमी झाले.

कदाचित वाघाच्या हल्ल्यात दुचाकी पडली असती तर मोठी दुर्घटना टाळता आली नसती. दैवत बलवत्तर म्हणून जीव वाचला ही मन या घटनेच्या निमित्ताने सार्थ ठरते. बऱ्याच दिवसापासून या परिसरामध्ये वाघाची दहशत असून अनेकदा दुचाकीस्वारांना रस्त्यावर अडविण्याचे प्रकार देखील घडलेले आहेत तर अनेकांना, अचानक पणे व्याघ्रदर्शन देखील बरेचदा आष्टी ते धाडी दरम्यान घाट परिसरामध्ये झाले आहेत. दोन्ही युवक किरकोळ जखमी असून ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यावेळी वनक्षेत्र सहाय्यक पि. डी. बैस, एन. आर. देशमुख व कर्मचारी यांची उपस्थिती होती.