Accident on Dhule-Solapur National Highway, 1 killed and 4 seriously injured

अपघात झाल्यानंतर घटनास्थळी उपस्थितांनी टोलनाक्यावरील रुग्णवाहिका बोलावून घेतली. रुग्णवाहिका तात्काळ दाखल झाल्यानंतर जखमींना रुग्णालयाच उपचारासाठी दाखल कऱण्यात आले आहे. तपासणी करताना डॉक्टरांनी शिव अग्रवाल याला मयत घोषित केले.

जालना : कारला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने एकाचे अपघाती निधन (1 killed in Accident) झाले आहे. तर इतर ४ जण गंभीर जखमी (injured)  झाले आहेत. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (Dhule-Solapur National Highway) भीषण अपघात (Accident ) झाला आहे. ही घटना महामार्गावरील वडीगोद्री गावाच्या येथे घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी काहीजण औरंगाबादकडे रवाना झाले होते. महामार्गावरील वडीगोद्रा गावाजवळ एका अज्ञात वाहनाने कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये कारचा चक्काचूर झाला आहे. यामद्ये मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव शिव पुरुषोत्तम अग्रवाल(१७) आहे. तर इतर कामील खान शब्बीर खान (१६), क्षितिज मनीष रणखांब (१६), ओम अग्रवाल वय (१६) शेख मंजूर शेख बशीर(५२) हे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघात झाल्यानंतर घटनास्थळी उपस्थितांनी टोलनाक्यावरील रुग्णवाहिका बोलावून घेतली. रुग्णवाहिका तात्काळ दाखल झाल्यानंतर जखमींना रुग्णालयाच उपचारासाठी दाखल कऱण्यात आले आहे. तपासणी करताना डॉक्टरांनी शिव अग्रवाल याला मयत घोषित केले. तर इतर चार जणांवर उपचार सुरु आहे. तसेच अपघाताची गोंदी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.