चंद्रकांत पाटील यांच्यानंतर भाजपचे नेते रावसाहेब दानवेंनाही जबरदस्त धक्का

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यापाठोपाठ भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनाही ग्रामपंचायत मिवडणुकीत जबरदस्त धक्का बसला आहे. भोदरदन तालुक्यातील प्रमुख गावात महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे. पिंपळगाव रेणुकाई ग्रामपंचायत, सिपोरा बाजार ग्रामपंचायत, वालसावंगी ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली आहे. दणदणीत विजय मिळवत राष्ट्रवादीने भाजपला जोर का झटका दिला आहे. तर, पारध ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात गेली आहे.

जालना : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यापाठोपाठ भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनाही ग्रामपंचायत मिवडणुकीत जबरदस्त धक्का बसला आहे. भोदरदन तालुक्यातील प्रमुख गावात महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे.

पिंपळगाव रेणुकाई ग्रामपंचायत, सिपोरा बाजार ग्रामपंचायत, वालसावंगी ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली आहे. दणदणीत विजय मिळवत राष्ट्रवादीने भाजपला जोर का झटका दिला आहे. तर, पारध ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात गेली आहे.

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक कोणीही कसेही लढले तरी भाजप पूर्ण ताकतनिशी लढणार, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील म्हणाले होते. मात्र, कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटलांना मोठा धक्का बसला आहे. मूळगावी देखील त्यांचा पराभव झाला आहे.

चंद्रकांतदादा पाटील यांचे मुळ गाव असलेल्या खानापुरात शिवसेनेने सहा जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेनेच्या प्रकाश आबिटकर यांनी बाजी मारली आहे.