मराठा समाजाचं रावसाहेब दानवे, कैलास गोरंट्याल यांच्या घरासमोर थाळीनाद आंदोलन ; दानवेंचे बंधूही आंदोलनात सहभागी

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाजामध्ये असंतोषाचे वातावरण आहे. त्यापार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने आज जालन्यात आमदार कैलास गोरंट्याल यांच्या घरासमोर ढोलताशे वाजवून थाळीनादही केला. यावेळी आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं आणि एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा देण्यात आल्या.

जालना: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मराठी क्रांती मोर्चाने (Maratha Kranti Morcha )आंदोलनाला सुरूवात केली आहे. आंदोलकांनी भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) , जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) , काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम (Viswajit Kadam) यांच्या घरासमोरही थाळीनाद करून आरक्षणाची मागणी केली. दानवे यांचे चुलत बंधू आणि भाजपचे उपाध्यक्ष भास्कर दानवे (Bhaskar Danve) यांनीही आंदोलनात (Agitation) भाग घेत मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला.

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाजामध्ये असंतोषाचे वातावरण आहे. त्यापार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने आज जालन्यात आमदार कैलास गोरंट्याल यांच्या घरासमोर ढोलताशे वाजवून थाळीनादही केला. यावेळी आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं आणि एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे चुलत बंधू आणि भाजपचे उपाध्यक्ष भास्कर दानवे हे सुद्धा आंदोलनात सहभागी झाले होते.

सांगलीतही आंदोलकांनी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या घरासमोर आंदोलन करत कदम यांना मागण्यांचे निवेदन सादर केलं. सकल मराठा समाजाने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या इस्लामपूर येथील घरासमोर जोरदार निदर्शने करत घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलकांनी हलगी वाजवून आपला रोष व्यक्त केला आहे.