I would commit suicide if I was not given alcohol and gutkha Dhingana of a corona patient at Jalgaon covid Center

पैसे कमविण्यासाठी शाळांमध्ये डान्सबार, लॉज, गुटखा आणि सिगारेट विक्री आणि मद्यविक्रीची तात्पुरत्या स्वरुपाची परवानगी द्या, असं पत्रच इंग्रजी शाळा असोसिएशनने मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. यातून राज्यसरकारला भरभक्कम महसूल मिळेल असंही असोसिएशनने या पत्रात म्हटलं आहे.

    जालना : शाळांमध्ये डान्सबार, लॉज,आणि दारु विकण्याची परवानगी द्या अशी अजब मागणी शिक्षक संघटेनेने केली आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच या मागणीचे पत्र लिहीले आहे.

    जालन्यातील शाळा असोसिएशनने मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहीले आहे. मागील वर्षी मार्च २०२० देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद करण्यात आल्या. आता वर्ष उलटले तरी शाळा बंदच आहेत. यामुळे संस्थाचालक त्रस्त झाले असून, शिक्षकांना देखील आर्थित अडचणींचा सामना करावा लागत आहे.

    पैसे कमविण्यासाठी शाळांमध्ये डान्सबार, लॉज, गुटखा आणि सिगारेट विक्री आणि मद्यविक्रीची तात्पुरत्या स्वरुपाची परवानगी द्या, असं पत्रच इंग्रजी शाळा असोसिएशनने मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. यातून राज्यसरकारला भरभक्कम महसूल मिळेल असंही असोसिएशनने या पत्रात म्हटलं आहे.

    सध्या ३१ मार्च जवळ आल्याने संस्थाचालकांना तसेच शिक्षकांना त्यांनी घेतलेल्या कर्जाची फेड करण्यासाठी बँकानी तगादा लावला आहे. यामुळे संस्थाचालकांसह शिक्षकही अडचणीत सापडले आहे. यामुळे त्यांनी उत्पन्न स्त्रोत म्हणून शाळांमध्ये डान्सबार, लॉज, गुटखा आणि सिगारेट विक्री आणि मद्यविक्रीची परवानगी मागीतली आहे.