अमळनेर तौत्के चक्रीवादळाचा तडाखा! झोपडीवर झाड कोसळून दोन बहिणी ठार

रणाईचे येथे राजेंद्र भीमराव पाटील यांच्या शेतात सालदरकी करण्यासाठी आलेल्या बल्लू बारेला याने गावाबाहेर खळ्यात स्वतःची झोपडी तयार केली होती १६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानक जोरात वादळ आणि पाऊस सुरू झाला काही कळण्याच्या आत खळ्यात असलेले चिंचेचे झाड कोसळले त्यात बल्लू ची झोपडी दाबली गेली त्याची मोठी मुलगी ज्योती बारेला वय १६ आणि रोशनी बारेला वय १० या दोघे बहिणी झाडाखाली दाबल्या जाऊन त्यांचा मृत्यू झाला.

    अमळनेर : तालुक्यातील अंचलवाडी येथे वादळामुळे गावाबाहेरील खळ्यात चिंचेचे झाड कोसळून झोपडी दाबली जाऊन दोन पावरा समाजाच्या बहिणीचा दबल्याने मृत्यू झाला आहे.

    रणाईचे येथे राजेंद्र भीमराव पाटील यांच्या शेतात सालदरकी करण्यासाठी आलेल्या बल्लू बारेला याने गावाबाहेर खळ्यात स्वतःची झोपडी तयार केली होती १६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानक जोरात वादळ आणि पाऊस सुरू झाला काही कळण्याच्या आत खळ्यात असलेले चिंचेचे झाड कोसळले त्यात बल्लू ची झोपडी दाबली गेली त्याची मोठी मुलगी ज्योती बारेला वय १६ आणि रोशनी बारेला वय १० या दोघे बहिणी झाडाखाली दाबल्या जाऊन त्यांचा मृत्यू झाला.

    ताबडतोब गावातील सरपंच भगवान बवल पाटील , रंगराव पाटील , गोपाळ मुरलीधर पाटील यांच्यासह गावातील नागरिक तरुण मदतीला धावून आले. संपूर्ण घर दाबले गेल्याने झाड कापून मुलींना व घरचे समान काढण्याची प्रक्रिया सुरू होती