amit deshmukh

राज्य सरकारने खरेदी केलेल्या कोरोना तपासणीच्या १२ लाख ५० हजार या सदोष आढळून आल्या होत्या. या सर्व किट्स राज्यभरात वाटण्यात आल्या होत्या, तसेच या सर्व किट्स वैद्यकीय शिक्षण संचलयानं खरेदी केल्या असल्याचं सांगून आरोग्यमंत्र्यांनी अंग झटकले होते. राज्य सरकारने खरेदी केलेल्या GCC Biotech Ltd कंपनीच्या किट्स सदोष असल्याचा रिपोर्ट एनआयव्हीने दिल्याचंही ते म्हणाले होते.

जालना : राज्यात कोरोनाच्या चाचणीसाठी सदोष आरटी पीसीआर किट्स ( faulty RTPCR kits )  वितरित झाल्याची कबुली आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. यासंदर्भात बोलताना सखोल माहिती न घेता आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी वक्तव्य केले असे म्हणत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी म्हणत नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान या सदोष आरटीपीसीआर किट्स प्रकरणी समिती स्थाप केली आहे. याचा अहवाल आल्यावर कारवाई केली जाणार असल्याचं अमित देशमुख (Amit Deshmukh ) यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारने खरेदी केलेल्या कोरोना तपासणीच्या १२ लाख ५० हजार या सदोष आढळून आल्या होत्या. या सर्व किट्स राज्यभरात वाटण्यात आल्या होत्या, तसेच या सर्व किट्स वैद्यकीय शिक्षण संचलयानं खरेदी केल्या असल्याचं सांगून आरोग्यमंत्र्यांनी अंग झटकले होते. राज्य सरकारने खरेदी केलेल्या GCC Biotech Ltd कंपनीच्या किट्स सदोष असल्याचा रिपोर्ट एनआयव्हीने दिल्याचंही ते म्हणाले होते.

दरम्यान, RTPCR किट्स या केंद्र सरकारच्या ICMR संस्थेनं नियुक्त केलेल्या पुरवठादाराकडून मिळाल्या आहेत. त्यामुळं खरेदीबाबत टोपे यांचा झालेला गैरसमज दूर करणार असल्याचं देशमुख म्हणाले.