जालना जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप वाढला, कोरोनामुळे २ जणांचा मृत्यू

  • जालना शहरात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोना बाधितांची जालन्यातील आकडा ८६० वर पोचला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. पण ५१५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हाधिकारी स्थानिक पातळीवर अनेक उपाययोजना राबवित आहेत.कोरोनामुळे जिल्ह्यात ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जालना – जालना जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. कोरोनाचा प्रकोप वाढतच आहे. कोरोनावर उपचार घेणाऱ्या २ कोरोना बाधितांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तसेच आणखी ८ लोकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जालना शहरातील शासकीय रुग्णालयाने गुरुवारी २३२ कोरोना संशयितांचे अहवाल तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले होते. त्यातील ८ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह तर ६ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. उर्वरित २१८ रुग्णांचा अहवाल प्रलंबित आहे. 

जालना शहरात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोना बाधितांची जालन्यातील आकडा ८६० वर पोचला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. पण ५१५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हाधिकारी स्थानिक पातळीवर अनेक उपाययोजना राबवित आहेत.कोरोनामुळे जिल्ह्यात ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.